दिनांक : ०३/०७/२०२५
प्रति,
पोलीस आयुक्त ठाणे शहर/पुणे शहर/नवी मुंबई/नागपूर शहर/पिंपरी-चिंचवड/नाशिक शहर/ छत्रपती संभाजी नगर/सोलापूर शहर / अमरावती शहर / मिरा भाईंदर वसई विरार/ लोहमार्ग, मुंबई.
२) पोलीस अधीक्षक अहिल्यानगर / अकोला /अमरावती / छत्रपती संभाजी नगर ग्रा./बीड/ बुलढाणा / भंडारा/ चंद्रपूर/जालना /धाराशिव/नांदेड/लातूर/परभणी/हिंगोली/कोल्हापूर/पुणे ग्रा./सांगली/सातारा/सोलापूर ग्रा./गडचिरोली/गोंदिया / नागपूर ग्रा./ धुळे / जळगाव/ नाशिक ग्रा./नंदुरबार/ रायगड/ स्त्नागिरी/सिंधुदूर्ग/ठाणे ग्रा./ पालघर /वाशिम / यवतमाळ / वर्धा
३) पोलीस अधीक्षक- महामार्ग पोलीस ठाणे/पुणे / छत्रपती संभाजी नगर / रायगड व नागपूर परिक्षेत्र.
विषयः ई चलानची कारवाई करताना स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनचा फोटो/चित्रीकरण करीता वापर न करण्याबाबत.
संदर्भ :- (१) दि. ०२/०७/२०२५ रोजी मा. परिवहन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली वाहतुक संघटनांसोबत झालेली बैठक.
(२) या कार्यालयाचे पत्र जा. क. अपोमसं (वा)/४४/वाचक/ई-चलान/७४३/२०२० दिनांक २/३/२०२०
(३) या कार्यालयाचे पत्र जा. क. अपोमसं (वा)/४५/नियोजन/ई-चलान/२९६३/२०२० दि. १/९/२०२२
(४) या कार्यालयाचे पत्र जा. क. अपोमसं (वा) / ४५/नियोजन/ई-चलान/२८२६/२०२४ दि.१६/९/२०२५
उपरोक्त विषय व संदर्भास अनुसरून मा. मंत्री, परिवहन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक ०२/०७/२०२५ रोजी विधान भवनात वाहतूक संघटनांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमलेले वाहतुक पोलीस अधिकारी / अंमलदार हे त्यांचे खाजगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनांचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात बाबतचा मुद्या सदर बैठकीमध्ये वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी यांचेकडून उपस्थित करण्यात आला होता. त्याबाबत मा. मंत्री, परिवहन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या कार्यालयाकडून ई चलानची कारवाई करताना स्वतःचे खाजगी मोबाईल फोनचा वापर न करणेबाबत उपरोक्त संदर्भ क्र. २ ते ४ चे पत्रान्यये यापुर्वीच आदेशीत करण्यात आले होते.
परंतु असे निदर्शनास आले आहे की, अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी / अंमलदार हे स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ (real time) सोडून, ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईलमधील फोटोचा वापर करून चुकीच्या पध्दतीने चलान जनरेट करतात. अशाप्रकारे खाजगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलान करताना पोलीस अधिकारी / अंमलदार निदर्शनास आल्यास, त्यांचेविरुध्द शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी.
(प्रविण साळुंके) अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य मुंबई
प्रत माहितीकरीताः-
१) मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
२) परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई
0 Comments