भारत निवडणूक आयोगाच्या निदेशानुसार नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisor) यांच्या मानधनाबाबत.
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक:- ईएलआर-२०२५/प्र.क्र.७०/२५/नि-६
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक :- १ सप्टेंबर, २०२५
वाचा:- १) भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/आयएनएसटी/२०१५-ईआरएस, दिनांक ०८ जुलै, २०१५.
प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायचित्र मतदार याद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officers) यांची नेमणूक झालेली आहे. तसेच प्रत्येक १० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officers) यांच्या कामकाजाचे देखरेख व मुल्यमापन करण्यासाठी एका पर्यवेक्षकांची (BLO Supervisors) नेमणूक करण्यात आलेली आहे.
२. छायचित्र मतदार याद्यांची प्रतवारी सुधारण्यासाठी व त्या संपूर्णतः अचूक होण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officers) यांना सहाय्य करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे (Booth Level Officers) यांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे व त्यांच्या कामांचे मुल्यमापन करणे इत्यादी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisors) यांची प्रमुख कामे आहेत. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisors) हे त्यांच्यावर सोपविण्यात येणारी सदर कामे ही त्यांच्या मूळ कार्यालयातील कामे सांभाळून करीत असतात. दि. २६ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisors) यांना प्रतीवर्षी रु.१२,०००/- या दराने मानधन देण्यात येत आहे.
३. भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या दि. २४.०७.२०२५ च्या पत्रान्वये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisors) यांना रु. १२,०००/- ऐवजी रु. १८,०००/- मानधन देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
शासन निर्णय :-
४. भारत निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक (BLO Supervisors) यांना प्रतिवर्षी रु.१२,०००/- ऐवजी रु. १८,०००/- (रु. अठरा हजार फक्त) एवढे सुधारित मानधन देण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर सुधारित मानधन दिनांक ०१ सप्टेंबर, २०२५ पासून लागू होईल.
शासन निर्णय क्रमांका ईएलआर-२०२५/प्र.क्र.७०/२५/नि-६
५. उपरोक्त बाबींवर होणारा खर्च २०१५-निवडणूका, १०३-मतदारांच्या याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण (००) (०१) मतदार याद्या तयार करणे व त्यांचे मुद्रण, १३ कार्यालयीन खर्च, संगणक संकेतांक २०१५००३२ या लेखाशीर्षाखाली खर्ची घालावा व संबंधित वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
६. सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.५०७/व्यय-४, दि.०५.०८.२०२५. अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०९०१११४४११०२०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
MANOHAR RAMCHANDRA PARKAR
(म.रा. पारकर)
उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी,
महाराष्ट्र राज्य
प्रतिः-
१) विभागीय आयुक्त (सर्व)
२) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्व)
३) महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-१, मुंबई.
४) महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र-२, नागपूर.
५) अधिदान व लेखाधिकारी,
६) निवासी लेखा परीक्षा अधिकारी.
७) सर्व जिल्हा कोषा अधिकारी,
८) वित्त विभाग-व्यय-४, मंत्रालय, मुंबई.
१) निवडनस्ती.
पृष्ठ २ पैकी २
0 Comments