शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत...दिनांक: १० सप्टेंबर, २०२५.

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी
कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत...
दिनांक: १० सप्टेंबर, २०२५.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन परिपत्रक क्रमांक जीएडी-३२०३६/३१/२०२५-जीएडी (रवका-१.)
६३१, मंत्रालय (विस्तार), मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई. पिन ४०००३२.
दिनांक: १० सप्टेंबर, २०२५.

१ शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक आयएनडी-११७९/४४/अठसवका), दि.०६.०२.१९८०.

२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ व दि.१०.१०.२०२३.

शासन परिपत्रक.

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र.संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.०७.०५.२०१४ द्वारे सूचना देण्यात आल्या होत्या. शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्र. संकीर्ण-२०१४/प्र.क्र.१६/१८ (रवका), दि.१०.१०.२०२३ द्वारे उक्त सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला.

२. असे असताही, काही शासकीय अधिकारी/कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे निदर्शनास आले आहे.

३.म्हणून, आता पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत-

१) राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे.

२) कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणा-या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.

४. वरील परिच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख/विभाग प्रमुख यांची राहील.

शासन परिपत्रक क्रमांक जीएडी-३२०३६/३१/२०२५-जीएडी (रवका-१)

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२५०९१०१८०५५२२७०७असा आहे. हे शासन परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

प्रति,
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(शहाजहान मुलाणी) शासनाचे उपसचिव.

१) मा. राज्यपाल यांचे सचिव, राज भवन, मुंबई.
२) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
३) मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
४) मा. अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा, यांचे सचिव, विधान भवन, मुंबई.
५) मा. उप मुख्यमंत्री, नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
६) मा. उप मुख्यमंत्री, वित्त व नियोजन, यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
७) सर्व मा. मंत्री/मा. राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान भवन, मुंबई.
९) सर्व मा. संसद सदस्य/विधानपरिषद सदस्य/विधानसभा सदस्य,
१०) मा. मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,
११) सर्व प्रशासनिक विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई (त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याच्या विनंतीसह).
१२) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१३) पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
१५७ महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१४) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई.
१६) सर्व विभागीय आयुक्त.
१७) सर्व पोलीस आयुक्त (पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, वगळून).
१८) सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक,
१९) सर्व जिल्हाधिकारी,
२०) सर्व महानगरपालिकांचे आयुक्त (बृहन्मुंबई महानगरपालिका वगळूना.
२१) सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक,
२२) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

Post a Comment

0 Comments