दिनांक : २१/०८/२०२५
प्रति,
उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व
विषय :- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणांतर्गत प्रमाणपत्र वितरणाबाबत सूचना
दिनांक ०२.०६.२०२५ ते १२.०६.२०२५ या कालावधीत वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणाच्या अनुषंगाने वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरीत करण्याबाबत पुढील सूचना देण्यात येत आहेत
1. दिनांक ०२.०६.२०२५ ते १२.०६.२०२५ या कालावधीत (१० दिवस) निर्धारित वेळेत उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थीनाच प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे.
2. निर्धारित केल्याप्रमाणे मुल्यमापनात प्रशिक्षणांतर्गत स्वाध्याय, प्रशिक्षणोत्तर चाचणी, प्रशिक्षणोत्तर स्वाध्याय, कृतिसंशोधन/नवोपक्रम/प्रकल्प या सर्व प्रकारांमध्ये किमान ५०% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
3. वरील दोन्ही बाबी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यालाच सोबत जोडलेले नमुना प्रमाणपत्र आपल्या स्तरावर छापून, त्यात प्रशिक्षणार्थीनी ज्या गटात प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्याच गटाची नोंद करून त्यावर प्राचार्य व केंद्रसमन्वयक यांच्या स्वाक्षरीने वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात यावे.
4. सदर प्रमाणपत्र छपाईसाठी प्रती प्रमाणपत्र रु २० च्या मर्यादेत खर्च मान्य केला जाईल.
(डॉ. कमलादेवी आवटे) सहसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
0 Comments