शिक्षक समिती कडून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब यांची टी ई टी परीक्षेच्या अनुषंगाने रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले.मा.मंत्री महोदयांनी तात्काळ राज्याचे शिक्षण मंत्री मा.ना.श्री.दादासाहेब भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशी चर्चा केली.यासंदर्भात मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कडून माहिती घेण्याचे काम सुरू असून येत्या दोन ते तिन दिवसात ते पूर्ण होईल.राज्यातील शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असून कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित घेतली जाईल असे मा.मंत्री महोदयांनी आश्वासित केले.

आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. उदयजी सामंत साहेब यांची टी ई टी परीक्षेच्या अनुषंगाने रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृहावर भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

मा.ना.श्री.उदयजी सामंत साहेब यांना सुप्रीम कोर्टाचा आदेश व त्याचे राज्यातील शिक्षकांना भोगावे लागणारे परिणाम याची सविस्तर माहिती देण्यात आली. मा.मंत्री महोदयांनी तात्काळ राज्याचे शिक्षण मंत्री मा.ना.श्री.दादासाहेब भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याच्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशी चर्चा केली, तसेच मा.शिक्षण मंत्री महोदयांनी रत्नागिरी जिल्ह्याचे सरचिटणीस श्री.संतोष पावणे व उपस्थित  पदाधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा केली. संघटनेने मा.मंत्री महोदयांना टी ई टी संदर्भात राज्य शासनाने शिक्षकांना योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती केली असता मा.शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितले की,यासंदर्भात मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या कडून माहिती घेण्याचे काम सुरू असून येत्या दोन ते तिन दिवसात ते पूर्ण होईल.राज्यातील शिक्षकांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने सरकार सकारात्मक असून कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची काळजी निश्चित घेतली जाईल असे मा.मंत्री महोदयांनी आश्वासित केले.

यावेळी संच मान्यतेचा शासन आदेश रद्द करण्यासंदर्भात देखील मा.पालकमंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.

जिल्हाअंतर्गत बदल्यातील सातवा टप्पा रद्द करून शिक्षकांच्यावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी संघटना पदाधिकाऱ्यांनी मा.पालकमंत्री यांच्याकडे केली असता  तात्काळ त्यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.श्री.यादव साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे  चर्चा करून रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीचा सातवा टप्पा रद्द करण्यात यावा असेही सांगितले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बदलीचा सातवा टप्पा रद्द होण्याची शक्यता आहे.

यावेळी राज्य सल्लागार श्री. विजयकुमार पंडित, जिल्हा नेते श्री.दिलीप महाडिक, जिल्हा कार्याध्यक्ष श्री.रुपेश जाधव,जिल्हा सरचिटणीस श्री.संतोष पावणे,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.राजेश शिर्के, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.मनीष देसाई,संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री.संदेश गावडे,रत्नागिरी तालुका सचिव श्री.सुभाष काटकर, संगमेश्वर तालुका सचिव श्री.संजय बांडागळे, संगमेश्वर तालुका कार्याध्यक्ष श्री.मिलिंद मांगले, जिल्हा सल्लागार श्री.सुजित साळवी,श्री.प्रविण देसाई,श्री.रविंद्र पराडकर,श्री.दीपक खेडेकर,श्री.रणजीत झोरे,श्री.सुनिल पवार  आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments