दिनांक : १५ सप्टेंबर, २०२५.
१) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.४६/सेवा-४, दि.०२.०२.२०२४.
२) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८/सेवा-४, दि. ०२.०५.२०२४.
३) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. रानिप्र-२०२४/प्र.क्र.३५/सेवा-४, दि. ३०.०५.२०२४.
४) समक्रमांकाचे दिनांक १५.०९.२०२५ रोजीचे शासन आदेश,
प्रस्तावना :
श्री. अरविंद रमेशराव विखे हे अधीक्षक (सारासे), गट-ब या पदावर नियुक्त होण्यापूर्वी दि.०१.०१.२००९ ते दि.३१.०८.२०१४ या कालावधीत पोलिस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत होते. पोलिस उपनिरीक्षक (पुरुष व महिला) (बिनहत्यारी) या पदासाठी सरळसेवेने पदभरतीबाबतच्या परीक्षेची जाहिरात दि.०८.०४.२००५ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदाची परीक्षा होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि.१०.१०.२००८ रोजी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवारांच्या शिफारशी शासनास कळविण्यात आल्या होत्या व त्यास अनुसरुन श्री. विखे हे पोलिस उपनिरीक्षक या पदावर दि.०१.०१.२००९ रोजी रुजु झाले.
२. वित्त विभागाच्या दि.३०.०५.२०२४ रोजीच्या शासन परिपत्रकातील अटींची पूर्तता श्री. विखे यांच्याबाबतीत होत असल्याने उपरोक्त संदर्भ क्र.४ येथील शासन आदेशान्वये श्री. विखे, अधीक्षक (शालेय पोषण) गट-ब यांची दि.०१.०१.२००९ ते दि.३१.०८.२०१४ या कालावधीतील पोलीस उपनिरीक्षक, गट-ब या पदावरील सेवा त्यांच्या दि.०१.०९,२०१४ पासूनच्या अधीक्षक (शालेय पोषण), गट-ब या पदावरील सेवेला फक्त सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनार्थ जोडून देण्यास याव्दारे शासन मान्यता देण्यात आली आहे.
३. तसेच, वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०२४ मधील तरतूदींची सदर प्रकरणी पूर्तता होत असल्यामुळे श्री. विखे, अधीक्षक (सारासे) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन), नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यीच बाब शासनाच्या विचाराधिन होती. याबाबत पुढीलप्रमाणे शासन आदेश देण्यात येत आहेतः-
शासन आदेश :-
वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०२४ मधील तरतूदीची सदर प्रकरणी पूर्तता होत असल्यामुळे श्री. विखे, अधीक्षक (सारासे) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन), नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम, १९९८ व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे.
२. श्री. विखे, अधीक्षक (सारासे) यांनी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय विहित मुदतीत सादर केलेला आहे.
३. वित्त विभाग, शासन निर्णय, दिनांक ०२.०२.२०२४ नुसार, वरील विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहे.
४. श्री. विखे, अधीक्षक (सारासे) यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचे नव्याने भविष्यनिर्वाह निधी (GPF) खाते तात्काळ उघडण्यात यावे. तसेच, श्री. विखे यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) मधील खाते बंद करुन, त्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम देय/अनुज्ञेय व्याजासह संबंधितांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्यनिर्वाह निधी खात्यात जमा करावी.
५. सद्यःस्थितीत प्रकरणी जुनी निवृत्ती वेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यातबाबत संदर्भ क्र.२ येथील शासन परिपत्रकान्वये वित्त विभागाने विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्यात यावी.
६. या अनुषंगाने आवश्यक त्या कार्यवाहीकरीता संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रक अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे.
19. सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०९१५१५४५०००२२१ असा आहे. हा शासन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,
प्रति,
(सिध्दार्थ घोरपडे
SIDDHARTHA SAHEBRAO GHORPADE
अवर सचिव, महाराष्ट्र शासन
१. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. संबंधित अधिकारी (आयुक्त (शिक्षण) यांचे कार्यालयामार्फत)
३. महालेखापाल (लेखा अनुज्ञेयता व लेखापरिक्षा) १
४. संबंधित जिल्हा लेखा कोषागरे
५. संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
0 Comments