फेब्रुवारी २०१३ पुर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य नसल्याबाबत 2 6 NOV 2021

2 6 NOV 2021

प्रति,
मा.श्री. कपिल पाटील, विधान परिषद सदस्य, शिक्षक भारती, पोयबावडी, केईएम हॉस्पिटल जवळ, कामगार मैदान, कामगार मैदान, परळ, मुंबई-१२

विषय :- फेब्रुवारी २०१३ पुर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा अनिवार्य नसल्याबाबत 

संदर्भ :- आपले दि.१५.११.२०२१ रोजीच पत्र

महोदय,
उपरोक्त संदर्भिय पत्राच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की, शासन निर्णय दि.१३.०२.२०१३ नुसार इयत्ता पहिली ते आठवी करिता नियुक्त शिक्षकांकरिता शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) अनिवार्य करण्यात आलेली आहे.

तथापि, सदर शासन निर्णयापुर्वी राज्य शासनामार्फत शिक्षक पात्रता परिक्षेबाबत कोणतेही आदेश निर्गमित झालेले नसल्याने दि.१३.०२.२०१३ पुर्वी इयत्ता पहिली ते आठवी वरील नियुक्त शिक्षकांना राज्य शासनाकडून शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) अनिवार्य केलेली दिसून येत नाही.

माहितीस्तव र्सावनय सादर

आपला विश्वासू

( संदीप संगवे) विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई.

प्रत माहिती व कार्यवाहीस्तव
शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, उत्तर, पश्चिम व दक्षिण विभाग

Post a Comment

0 Comments