मा. उच्च न्यायालयाकडील WRIT PETITION NO. २३४५/२०२४ दि.२७/०२/२०२५ च्या आदेशानुसार दि. ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व त्यानंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पेंशन प्रस्ताव सादर करणेबाबत.दि.: 09/09/2025

दि.: 09/09/2025
प्रति,
मुख्याध्यापक, अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा, जिल्हा नागपूर

विषयः- मा. उच्च न्यायालयाकडील WRIT PETITION NO. २३४५/२०२४ दि.२७/०२/२०२५ च्या आदेशानुसार दि. ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व त्यानंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पेंशन प्रस्ताव सादर करणेबाबत.
संदर्भ- १. मा. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर, यांच्या सभेतील सुचना दि. ०४/०९/२०२५

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणांस कळविण्यात येते की, मा. उच्च न्यायालयाकडील WRIT PETITION NO. २३४५/२०२४ दि.२७/०२/२०२५ च्या आदेशानुसार दि. ०१ नोव्हेंबर २००५ पुर्वी नियुक्त व त्यानंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशनच्या अनुषंगाने परिपुर्ण प्रस्ताव अद्याप सादर केलेले नसल्यास असे प्रस्ताव या कार्यालयास दि. १५/०९/२०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

आपल्या शाळेतील पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सादर न केल्यामुळे काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा मा. न्यायालयाचा अवमान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणांवर राहील याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, नागपूर

प्रत माहितीस्तव सविनय सादर
१. मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नागपूर
२. मा. शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे.

प्रत कार्यवाहीस्तव

अधिक्षक (माध्यमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, नागपूर यांना हे पत्र देऊन सुचित करण्यात येते की, मा. शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपुर यांच्या निर्देशानुसार प्रस्तावावावतची योग्य ती कार्यवाही करावी.

(गौतम गेडाम) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, नागपूर

Post a Comment

0 Comments