प्रति,
सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा
जिल्हा छ. संभाजीनगर
विषय :- राज्यातील खाजगी मान्यता प्राप्त उच्च माध्यमिक प्राथमिक शाळातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे बाबत.
संदर्भ :-१. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. वेतन-२०१९/प्र.क्र.४८/टीएनटी-३ दिनांक-३१.०७.२०२५
२. मा. शिक्षण उपसंचालक कार्यालय यांचे पत्र क्र. जा.क्र.शिउर्स/औ/लेखा-३/संकीर्ण/२०२५-२६/५४४२ दिनांक २४/०९/२०२५
उपरोक्त संदर्भीय क्र. ०१ नुसार शासन निर्णयातील अनुक्रमांक. १० नुसार शिपाई या संवर्गा करिता १२ वर्षा नंतर एस-३ व २४ वर्षानंतर एस-४ मध्ये वेतन घेत आहे. शिपाई या संवर्गा मध्ये एस-५ मध्ये वेतन घेत असल्यास माहे ऑक्टोंबर -२०२५ देय नोव्हेंबर-२०२५ या महिन्याच्या वेतनामध्ये एस-५ दिले असल्यास तर त्यांना एस-४ मध्ये वेतन निश्चिती करून त्यांची पडताळणी लेखाधिकारी शिक्षणं यांच्या मार्फत करण्यात यावी, व उक्त paymatrix मधील मूळ वेतन शालार्थ प्रणालीमद्ये Update करून Ddo 2 ला फॉरवाईड करून Approve करून घ्यावे व त्यानंतरच Oct 25 चे देयक Generate करावे.
तसेच एस-५ वरून एस-४ मध्ये वेतन पडताळणी नंतर येणारी रिकव्हरी संदर्भ क्र. २ नुसार सद्यस्थितित रक्कम वसूली बाबत पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे, त्यामुळे याबाबत आपणाला यथावकाश अवगत करण्यात येईल.
S-5 मध्ये कोणत्याही सेवकाचे वेतन मंजूर केले जाणार नाही.
आपला विश्वासू (म. ध. आव्हाड)
0 Comments