विषयः शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे वेळापत्रकातील अंशतः बदलाबाबत.०४-११-२०२५

०४-११-२०२५
१. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)
२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

विषयः शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे वेळापत्रकातील अंशतः बदलाबाबत.

संदर्भः १. प्रस्तुत कार्यालयाचे पत्र जा.क्र. साव्यावि/ राशैसंवप्रप / शिक्षक स्पर्धा/२०२५-२६/१४९०२७३
दि. १०-१०-२०२५

२. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांचे दि. ४-११-२०२५ रोजीचे निर्देश

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये, राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व शाळांमधील शिक्षक व अधिकारी / कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक, प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे, त्यांच्यात समन्वय, सहकार्य व स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल, भाषिक व सादरीकरण कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने तालुका, विभाग व राज्य स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून करण्यात आले आहे. संदर्भ क्र. १ अन्वये सदर शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धासाठीचे संपूर्ण नियोजन देण्यात आलेले आहे.

तथापि, संदर्भ क्र. २ अन्वये दि. २३-११-२०२५ रोजी TET परीक्षा असल्याने सदर नियोजनात अंशतः बदल करण्यात येत आहे. माहे नोव्हेंबर मधील दुसऱ्या शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या स्पर्धांबरोबर तिसऱ्या शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा घेण्यात याव्यात. तसेच दुसऱ्या शनिवारी घेण्यात येणाऱ्या स्पर्धांबरोबर तिसऱ्या शनिवारी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आयोजित कराव्यात. त्यामुळे दि. २१-११-२०२५ व २२-११-२०२५ या दिवशी कोणत्याही स्पर्धा असणार नाहीत. पहिल्या आणि चौथ्या शुक्रवारी व शनिवारी होणाऱ्या स्पर्धा पूर्वीच्या नियोजनाप्रमाणेच आयोजित कराव्यात. सदर बदल फक्त नोव्हेंबर २०२५ मधील तालुकास्तरीय स्पर्धांकरिता राहील. माहे डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ मधील अनुक्रमे विभाग स्तर व राज्य स्तर स्पर्धा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील. उपरोक्त वेळापत्रकातील बदल स्पर्धेशी संबंधित सर्वांना तात्काळ कळविण्यात यावेत.

Digitally signed by Rahul Ashok Rekhawar Date: 05-11-2025 16:20:31

(राहूल रेखावार भा.प्र.से.) संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादरः
१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
२. मा. आयुक्त (शिक्षण), शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे.

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव :

१. संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
२. संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
३. संचालक (योजना), शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
४. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व)
५. शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक, योजना), जिल्हा परिषद (सर्व)
६. गटशिक्षणाधिकारी (सर्व)

Post a Comment

0 Comments