सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची समाधी कराडच्या अलीकडे अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर वसंत गडाच्या पायथ्याशी असलेल्या तळबीड या गावात आहे. सरसेनापती यांचे पंजोबा रतोजी मोहिते हे अहमदनगरच्या निजामशहाच्या सेवेत होते. त्यांनी स्वपराक्रमाने निजामशहाच्या गळ्यात येणारी बंडाळी शमवली म्हणून खूष होऊन निजामशहाने त्यांची बाजी हा किताब दिला. हंसाजी हे हंबीररावांचे पहिले नाव. आजोबा तुकोजी यांनी स्वतः साठी तळबीडची पाटीलकी मिळवली आणि मोहिते,कराड परगण्यातील कसबे तळबीडचे वतनदार झाले.मोहित्यांचे व भोसल्याच्या राजघराण्याच्या तीन पेढ्याची नाते होते. सामान्य सैनिक काळापासून स्वकर्तृत्वाने हंसाजी मोहिते स्वराज्याच्या सैन्यात एक जबाबदार सरदार होते.हंसाजी मोहिते यांची स्वराज्य निष्ठा,संघटन चातुर्य लष्करी डावपेचतील कुशलता,मुत्सद्देगिरी शिस्त व पराक्रम हे बहुमोल गुण ओळखून शिवाजी महाराजांनी दि 8 एप्रिल 1674 त्यांना #हंबीरराव हा किताब दिला. व त्यांची #सरसेनापती या पदावर नियुक्ती केली (संंदर्भ - समकालीन जेधे शकावली).छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यरोहणाच्या वेळी महाराजांच्या मस्तकावर सुवर्णाभिषेक करण्याचा बहुमान सरसेनापती हंबीरराव यांना मिळाला. याप्रसंगी निघालेल्या शाही मिरवणूकीत महाराजांच्या हत्तीवर सोन्याचा अंकुश घेऊन हंबिररावांनी राज्यांच सारथ्य केल. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजांच्या आदेशानुसार व्यंकोजीराजांना तंजावरचे तख्त सोपवले. व दक्षिणेकडील कावेरी नदीपर्यंतचा प्रांत सामीलीकरण करून स्वराज्यात दाखल करुन घेतला. हा दक्षिण दिग्जिजयाचे शिल्पकार ही सरसेनापती हंबीरराव होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी राजे व प्रधान मंडळातील आपली बहीण सोयराबाई हिस व स्वपुत्र राजाराम महाराजांना छत्रपती बनविन्याचा मोह झाला.या वादाळाला खंबीरपणे वेळीच आवर घालून कोलमडू पाहणारा राज्यकारभार सावरून सरसेनापती संभाजी राजांचा राज्याभिषेक घडवून आणला.राज्यात स्थैर्य दिले.संभाजीराजांच्या कार्यकाळात साम्राज्याचा विस्तार नर्मदा ते कावेरी एवढा व्यापक झाला. यावेळी झालेल्या कितीतरी लढायांमध्ये सरसेनापती हंबीरराव निष्ठापूर्वक आणि सातत्याने सावलीसारखे राजांच्या पाठीशी उभे राहिले.रणांगणातील आपल्या अलौकिक पराक्रमामुळे या सेनापतीने कधीच पराभव स्वीकारला नाही.अनेक वर्षे प्रयत्न करून हताश झालेला मोगल बादशहा औरंगजेब हा जातीने दख्खनेत आला.त्याला मराठी साम्राज्य सलत होते व कोणत्याही प्रकारे हिंदवी स्वराज्याचा धुव्वा उडवून नायनाट करण्याची त्याची महत्वाकांशा होती.आपल्या सैन्याच्या जोरावर सात वर्षे त्यांची डाळ शिजू दिली नाही व त्याला नामोहरण करीत त्याची नाचक्की केली.औरंगजेबाच्या वतीने सर्जाखान वाई प्रातांत घुसला.हंबीररावांसह सेना गरजली आणी स्वराज्य सेनेची लाट सर्जाखानावर आदळली. हाताच्या मुठी पाशी सहा भोकं असणारी हंबीरराव यांची तलवार तळपत होती. त्यांनी सहाशे बळी घेतले पण त्याचा रोख सर्जाखानाकडे होता. हेरून एकेकाला जीवनातून बाजूला करत त्यांचा घोडा पुढे सरकत होता. तेवढ्यात शत्रू पक्षांची एक तोफ धडाडली आणि तिचा भयानक गोळा सणसणत आला आणि हंबीररावांच्या छातीवर आदळला. त्यातच एक धगधगते यज्ञकुंड चिरंतर शांत झाले. खूप हानी झाल्याने सर्जाखान वाईच्या रणातून पळाला होता. स्वराज्य सेवेचा विजय झाला होता या अंतिम क्षणीही प्रत्यक्ष मृत्युने रणांगणात विजयाची माळ त्यांच्या गळ्यात घातली होती. सोळाशे बहात्तर ते सोळाशे सत्याऐंशी असा सुमारे पंधरा वर्षाचा हा दैदिप्यमान काळ म्हणजे हंबीररावांची स्फूर्तिदायक आणि असामान्य यशोगाथा आहे.
#कैलाश_दुधणकर
#सरसेनापती #हंबीरराव_मोहिते #तळबीड #कराड #सातारा
#सह्यगिरी #सह्यगिरीच्या_पाऊलवाटा #सह्याद्री #सह्याद्रिच्या_वाटेवर #सह्याद्रीची_भटकंती #भटकंती #दुर्ग #वाटाड्या #इतिहासाच्या_पाऊलखुणा #
#शिवशक्ती_प्रतिष्ठान #सह्याद्रीच्या_वाटेवर
Sahyadri_explorer
#shivshakti🚩 #way_to_sahyadri #team_shivshakti #sahyadrichya_vatevar #shivshakti_pratishthan #sahyadri_clickers #sahyadri_savrdhan #kolhapur #maharastra #maharashtra #gadkille #durg_nad #sahyadrichya_paulkhuna


0 Comments