#स्वराज्याचा_तोफगाडा
“किल्ले सिंहगड” – “स्वराज्याचा तोफागडा” या उपक्रमाच्या माध्यामतून पहिला मान मिळाला तो किल्ले सिंहगडावरील तोफेला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी असलेली पावन भूमी, अन सरदार नावजी बलकवडे यांच्याही पराक्रमाची साक्ष देणारा, तसेच अनेक ऐतिहासिक घडामोडींचा राखणदार अन पुणेकरांचा सगळ्यात आवडता किल्ला म्हणून किल्ले सिंहगडकडे पहिले जाते. गडावरील तोफा म्हणजे साक्षात शक्तीरुप, संपूर्ण किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी या तोफांचीच, काली चंडीकेचे रुप घेउन शत्रूवर आग ओकणारी ही साधारणपणे २ टन वजनाची तोफ अशीच मातीवर धूळ खात पडून होती. प्रतिष्ठानच्या माध्यामतून लोकसहभागातून निधी उभा करून त्या तोफेसाठी एक लाकडी सागवानी तोफगाडा दिनांक १७ जून २०१८ रोजी बसवून त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.
“सह्याद्रीचा दुर्गसेवक”
सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र
0 Comments