मोरगिरी नावाचा अपरिचित किल्ला.









मोरगिरी नावाचा अपरिचित किल्ला...🚩 पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरात कोरीगड, घनगड, तुंग, तिकोना हे सर्वांच्या परिचयाचे किल्ले आहेत या किल्ल्यांबरोबर मोरगिरी नावाचा अपरिचित किल्ला या परिसरात आहे या किल्ल्याचे स्थान आणि त्यावरील अवशेष पाहाता हा किल्ला टेहळणीसाठी बांधला असावा मोरगिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या उध्वस्त झालेल्या असल्याने त्याठिकाणी लोखंडी शिडी बसवलेली आहे... जांभुळणे हे मोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असले तरी गावापासून किल्ल्याचा पायथा एक तास अंतरावर आहे गावातून मागे एक डोंगर आहे या डोंगरासमोर उभे राहील्यावर डोंगराच्या उजव्या अजून एक डोंगर दिसतो या दोन डोंगरांच्या मधील खिंडीतून डोंगरावर जाणारी मळलेली वाट आहे डोंगर धारेवरुन दाट झाडीतून १५ मिनिटे चढल्यावर कारवीचे रान लागते हे रान पार केले की आपण पठारावर पोहोचतो या ठिकाणी कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आहेत पायऱ्यानी वर चढून गेल्यावर समोरच पाण्याचे टाक आहे गडाच्या सर्वोच्च माथ्यावर उध्वस्त वास्तूचे अवशेष आहेत..गडावरून तुंग, तिकोना आणि कोरीगड हे किल्ले दिसतात... ✍️

Post a Comment

0 Comments