काळीज

काळीज...

काल कामानिमित्त जिल्ह्याच्या ठीकाणी जाण्याचा योग आला.
सर्व काम झाल्यावर वाटल चला ईथ राहणार्या एका मित्राला भेटाव.
माझा हा मित्र म्हणजे सरकारी नोकरी करणारा ,गलेलठ्ठ पगार असणारा.
एका शानदार घराचा मालक.
त्याच्या प्रत्येक शब्दामधुन श्रीमंती दाखवणारा.
पैसा,गाडी,बंगला,यावर भरभरुन बोलणारा माझा मित्र.
तस पाहील तर आम्ही बालमीत्र .
एकाच शाळेत शिकलो.
पुढे त्याला नोकरी लागली अन् मी मात्र सुशिक्षित बेरोजगार.
गावात राहुन वडीलांना शेतात मदत करणारा मी एक शेतकरी.
मी दारावरची बेल वाजवली.
मित्रान् दार उघडल.
अरे, राजु ये ये.
मित्रान् हसुन स्वागत केल.
गरमागरम चहा झाल्यावर मी मित्राला म्हणालो अरे माझ्यासोबत बाजारात चाल थोडी खरेदी करायची.
दहापंधरा मिनीटात तो तयार होऊन आला.
अन् आम्ही बाजारात निघालो.
चालता चालता मित्र भरभरून बोलत होता.
कार खरेदी केली,जमीन खरेदी केली.
माझ्याकड सांगण्यासारख काहीच नव्हत.
माझी सोयाबीन पाण्यान् गेली हे सांगाव का तुर उधळली हे सांगाव?
शावकाराच कर्ज झाल हे सांगु का  अजुन काही सांगु.
पुन्हा वाटल आपल रडगाण आपल्याच पोटात ठेवाव.
आम्ही एका कपड्याच्या दुकानात गेलो.
माझ्यासाठी छानसे दोन ड्रेस घेऊन आम्ही दुकानाबाहेर पडलो.
थोड फ्रेश होऊ या .मित्र म्हणाला.
मी म्हणालो कस काय?
अरे ब्लँक टी पिऊ मस्त,
मग जाऊ.
मी ,बर बर!
एका हाँटेलमध्ये गेलो.
दोन ब्लँक टी द्या ,मित्रान आँर्डर दिली.
मी चहाचा एक घोट घेतला अन् माझ लक्ष बाहेर गेल.
बाहेर एक म्हातारा माणुस 
हाँटेल मालकाला काहीतरी खायला मागत होता.
दाढी वाढलेली,अंगावर मळकट कपडे,हातात आधारासाठी काठी.
तेवढ्यात हाँटेल मालकान् वेटरला बोलावुन त्याला हाकलून दिल.
माझ्या डोळ्यातुन टपकन् दोन थेंब अश्रू पडले.
मी चहाचा कप खाली ठेवला अन् हाँटेलबाहेर पडलो.
अरे काय झाल? मित्र ओरडला.
मी हातानच त्याला थांबायची खुण केली.
बाहेर येवुन त्या म्हातार्याचा हात धरला अन् हाँटेलमध्ये घेऊन आलो.
म्हातार्यालाही कळेना काय व्हायल अन् हाँटेल मालकालाही कळेना काय व्हायल.
लगेच मी खाण्याची आँर्डर दिली.
एव्हाना सगळेच माझ्याकडे पहात होते.
काहींच्या डोळ्यात माझ्याबद्दल राग होता,काहींच्या डोळ्यात द्वेष.
आँर्डर दिलेले सगळे पदार्थ टेबलावर ठेवल्यावर म्हातारे आजोबा ते खाऊ लागले.
खाता खाता कधी माझ्याकड पाहुन डोळ्यातले अश्रू पुसु लागले.
माझ्याही डोळ्यातुन अश्रू वहात होते पण मी ते वाहु दिले.
ते अश्रू आनंदाचे होते,समाधानाचे होते, काहीतरी चांगल घडलय त्याचे होते.
खाण् झाल्यावर आजोबा उठले.
मी खिशात हात घातला ,तिकीटापुरते पैसे जवळ ठेऊन उरलेले पन्नास रुपये आजोबांच्या हातात दिले.
ते नको नको म्हणत असतांना सुद्धा मी ते जबरदस्तीने त्यांच्या हातात ठेवले.
जाता जाता आजोबांनी तोंडावरुन हात फीरवला अन् म्हणाले लेकरा सुखी रहा.
मी फक्त आजोबाकडे पहात राहीलो ते डोळ्यासमोरुन दुर जाईपर्यंत.
दुर टेबलावर बसलेला मित्र हे सगळ पहात होता.
हाँटेल मालकाला आपल्या क्रुत्याबद्दल लाज वाटली होती.
तो ही खाली मान् घालुन बसला होता.
माझ्या आजुबाजुला बसलेल्या लोकांच्या नजरा आता बदलल्या होत्या.
त्या नजरेत आता माया,ममता,प्रेम,अभिमान स्पष्ट दिसत होता.
मित्र जवळ आला अन् कडकडुन मिठी मारली.
लगेच म्हणाला, माझ्याजवळ लाखाची गाडी आहे,कोटीचा बंगला आहे,सगळ्या सुखसुविधा आहेत .
उलट तुझ्याकडे एक एकरच शेत आहे ,छोटस घर आहे,पैसा आहे पण गावाकड जाण्यासाठी लागणार्या तिकीटापुरताच पण तरीही मित्रा तु माझ्यापेक्षा श्रीमंत आहेस.
आता त्याच्या डोळ्यातुन अश्रू वहात होते.
मी त्याला एवढच म्हणालो,कुणाला मदत करण्यासाठी खुप मोठी संपत्ती असुन चालत नाही,
खुप मोठ्ठ मन् असाव लागत मित्रा.
नाही का?

राजकुमार नायक
सवना
9921581444
(आवडल्यास नावासह शेअर करण्यास हरकत नाही.)

Post a Comment

0 Comments