मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी यांचे 6 महिने पुर्ण झालेल्यांना कार्यमुक्त करणेबाबत परिपत्रक.. दिनांक :- १०/०२/२०२५

दिनांक :- १०/०२/२०२५
प्रति.
मा. विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख, शासकीय/निमशासकीय/खाजगी आस्थापना प्रमुख,
लातूर जिल्हा, सर्व.

विषय :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात येत असल्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत.

संदर्भ :
१. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३मंत्रालय, मुंबई दिनांक ०९ जुलै, २०२४.
२. मा. कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक: कौविउ २०२४/प्र.क्र.११८/प्रशा-२ दिनांक ०६ फेब्रुवारी, २०२५.
३. मा. उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर, यांचे पत्र जा. क्र. कौविरोवउविआछसं/कक्ष-५/ CMYKPY/४८९-४९७/२०२५ दिनांक ०५/०२/२०२५.

महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की, संदर्भ क्र.१ अन्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता (Employability) वाढविण्यासाठी "मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना" सन २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संदर्भीय शासन निर्णय भाग ४.३ नुसार सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल, सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. भाग ४.४ नुसार प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि भाग ४.१५ नुसार एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल असे नमुद आहे.

त्याअनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिल्या टप्यात रूजू झालेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा ६ महिन्यांचा कालावधी आता संपुष्टात आला आहे/ येण्यास सुरूवात झाली आहे. ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा कालावधी संपुष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणातून मुक्त करण्यात यावे. तसेच ज्या प्रशिक्षणार्थीचा कालावधी संपुष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थी उमेदवारांना www.cmykpy.mahaswayam.gov.in या पोर्टल वरिल आपल्या आस्थापनेचा User ID व Password वापरून अनुभव प्रमाणपत्र संदर्भ क्र.२ नुसार आपल्या स्तरावरून देण्याची कार्यवाही अनुसरण्यात यावी. तसेच या योजनेतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वाटप केलेल्या प्रमाणपत्र वाटपाचे अभिलेख जतन करून ठेवन्यात यावे, हि विनंती.

सोबत :- संदर्भीय सहपत्रे
सहायक आयुक्त,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूर.

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
१. मा. आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई.
२. मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, लातूर.
३. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर.
४. मा. उपआयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर.

Post a Comment

0 Comments