शिक्षक समिती नोंदणीकृत संघटना म्हणून मान्यता प्राप्त संघटना



*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ही प्राथमिक शिक्षकांची प्रातिनिधिक संघटना म्हणून, श्रमिक सेवा संघ अधिनियम 1926 या  कायद्याखाली नोंदणीकृत संघटना म्हणून मान्यता प्राप्त संघटना बनली असून तिचा रजिस्ट्रेशन नंबर 4921 असा आहे.*

        *महाराष्ट्र राज्यात अनेक, कर्मचारी, शिक्षक, प्राध्यापक,कामगार, संघटना असून यातील शासनमान्य संघटना किती व कोणत्या यावर चर्चेचे गुऱ्हाळ रचले जायचे.*
       *महाराष्ट्रात तर प्राथमिक शिक्षकांच्या सर्वात जास्त संघटना असून प्रत्येक राजकीय पक्षाच्या नावाने आणि त्या पक्षाच्या राजकीय आश्रयाने  चालवल्या जाणाऱ्या शिक्षक संघटना हल्ली उदयास आल्या आहेत. लेटरहेड छापायचे आणि त्यावर शासनाकडे निवेदने देणे त्याचे फोटो वाॅटस्-अॅपवरून  फॉरवर्ड करणे आणि आमचीच संघटना अधिकृत आहे. असे फक्त सांगत फिरणे यामुळे कामगार, कर्मचारी, शिक्षक यांची शक्ती विखुरले गेली त्याचाच परिणाम म्हणून शासनाने फोडा आणि झोडा ही नीति वापरून कामगार /कर्मचारी / शिक्षकांच्या संघर्षमय चळवळी बोथट बनविल्या. परिणामतः प्रश्न सुटण्यापेक्षा नवनवीन प्रश्न तयार होत आहेत.*
         *माझ्या माहितीनुसार 2008 साली देवाजी नाना गांगुर्डे राज्याध्यक्ष आणि जगन्नाथ सुर्वे महासचिव असताना, महाराष्ट्र शासनाने एका शासकीय पत्राद्वारे एक विशिष्ट नमुना पत्राद्वारे प्रत्येक संघटनेला आपली अधिकृत माहिती आणि ऑडिट केलेली हिशोब पत्रके सादर करण्यास कळविले होते. हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्यातच संघटना शासनाला माहिती सादर करू शकल्या. विहित मुदतीत ज्यांची तालुका, जिल्हा व राज्य स्तरिय अधिवेशने आयोजित करुन लोकशाही पद्धतीने नेतृत्व निवडले जातात नाही आणि आर्थिक हिशोबाचा थांगपत्ता नाही ते शासनाला कसली माहिती देणार?*
        *आम्हाला अभिमान आहे की, या बाबतीत शिक्षक समिती कधीच कमी पडलेली नाही. आता ही संघटना, श्रमिक सेवा अधिनियम 1926 या कायद्याखाली नोंद झाल्यामुळे, कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढणार आहे. प्रत्येक शाखेला जास्तीत जास्त सभासद नोंदवून त्यांची विशिष्ट नमुन्यात हिशोब पत्रके तयार करून, ऑडिट रिपोर्ट सहित ती शासनाकडे सादर करावीच लागणार आहेत. शिवाय रेल्वे एस्. टी., विज महामंडळाच्या संघटनांचे नेतृत्व जसे कामगार अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या निवडणूक प्राधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली निवडणूक घेऊन निवडले जाते तशाच प्रकारे  आपल्या  संघटनेचे नेतृत्व निवडले जाणार आहे. संघटनेत किमान शिस्त निर्माण होईल. राज्याध्यक्ष उदय शिंदे आणि महासचिव विजय कोंबे नी आपली संघटना श्रमिक सेवा संघ अधिनियमाखाली रजिस्ट्रेशन करून घेतली त्याबद्दल त्याना धन्यवाद!*

*चंद्रकांत अणावकर*

Post a Comment

1 Comments

  1. Congratulations, Mr.President and Secretary of Maharashtra state shikshak samiti union

    ReplyDelete